स्वच्छ-सुंदर शहरासाठी जागरूक सामान्य नागरिकाची धडपड [ निवेदनातून कचरामुक्तीच्या उपायाची गाथा ]

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अस्वच्छतेच्या कारभारावर प्रतिदिन ताशेरे ओढले जात असल्याने अनेकांना खंत वाटत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे डीआरएम जैन यांनी कचऱ्याबाबत बोचरी टीका केल्यामुळे डोंबिवली घाणेरडे शहर म्हणून शिक्का मोर्बत झाले आहे. यावर मात म्हणून आता झोपलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जागे करण्यास सामान्य डोंबिवलीकर अक्षय म्हात्रे हा समोर आला आहे. म्हात्रे यांनी निवेदनाच्या माध्यमातून कचरा मुक्तीच्या उपायाची गाथा आयुक्त गोविद बोडके यांना सांगितली आहे.

डोंबिवली शहरात कचऱ्यामुळे गोर-गरिबांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे ही वस्तुस्थिती असून कचरामुक्त शहर व्हायलाच पाहिजे. सामान्य डोंबिवलीकर अक्षय म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे कि, शहरातील लोक्प्रतीनिधिंनी जागरूक होऊन कचराकुंडी असण्याठिकाणी स्वच्छता राखा असे फलक लावावे. नागरिकांनी रात्री 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच कचरा कुंडीत टाकावा. दुकानदार तसेच फेरीवाले यांना सक्तीने याबद्दलचे नियोजक करण्यास भाग पडावे. ठराविक वेळेनंतर कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना कायद्याने दंड करावा. पालिका प्रशासनाने कचरा उचलण्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज देऊन कारवाई करावी आणि चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांस प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करावा. विशेष म्हणजे कचराकुंडी मुक्त शहर होण्यावर भर द्यावा. ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून यामध्ये स्वयंरोजगराची संकल्पना रुजू होण्यास पालिकेने पुढाकार घ्यावा. अक्षय म्हात्रे यांनी मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनाही अशाच पद्धतीचे निवेदन दिले असल्याचेही सांगितले. याबाबत महापौर विनिता राणे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले कि, पूर्वीपेक्षा कचऱ्याची समस्या सोडविण्यात आम्हाला यश आले असून या विषयी अजून काम करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित होत आहेत. नागरिकांचाही मोठ्या प्रमाणत प्रतिसाद मिळत असून स्वच्छ आणि सुंदर शहराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. कारण अनेक सामान्य नागरिक स्वतःहून प्रशासनाच्या कामात मदत करीत आहेत.