धुवाधार परतीच्या अतिवृष्टीमुळे लाखोंचे नुकसान [ पंचनामेकरून नुकसान भरपाईची मागणी ]

डोंबिवली : शहरात तसचे औद्योगिक विभागातील निवासी भागात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. शासनाकडे या नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याची माहिती डोंबिवली वेलफेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी दिली आहे.

गुरुवारी गडगडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे मिलापनगर निवासी विभागातील सुदर्शननगर सिस्टर निवोदिता गल्लीत ३, ग्रीन स्कुल गल्लीमागे २, सेंट जोसेफ स्कुल गल्लीत १, सर्विस रोड २, तलाव रोडला १, पेंढरकर कॉलेज, उस्मा पेट्रोल पंप रोड ८ ते १० अशी सुमारे 20 मोठी झाडे उमळून रस्त्यावरपडून रस्ते बंद झाले. यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. महापालिकेच्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी तत्काळ परीस्थित आटोक्यात आणली. या घटनेत मिलापनगर मधील रहिवासी झाड पडताना थोडक्यात बचावले. ग्रीन्स इंग्लिश स्कुलचे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शाळेच्या बसच्या काचा फुटल्या असून गच्चीवरील पत्रेही तुटून पडले आहेत.