नामदार गोपाळ कृष्ण गोखले शाळेच्या मदतीसाठी माजी विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन [ तुमची गोखले शाळा तुमच्या सर्वांची वाट पाहत आहे ]
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कनिष्ठ अभियंता आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखाले शाळेचे माजी विद्यार्थी राजेश म्हात्रे यांनी शाळेच्या अंतर्गत दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले आहे. तसेच शाळेचे सर्व माजी विध्यार्थी आणि हितचिंतक यांना या विषयी होणाऱ्या सभेला उपस्थित राहणाचा आग्रहही केला आहे.
शाळेच्या अंतर्गत दुरुस्तीमध्ये शाळेची वास्तू आतून बाहेरून दुरुस्ती करून रंगकाम करणे, शाळेचे होतकरू गरीब विद्यार्थी दत्तक घेणे, शाळेला बेंचेस पुरविणे किंवा त्यांची दुरुस्ती करणे, शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे, शाळेला क्रीडा साहित्य, पुस्तके, आधुनिक उपकरणे, प्रयोग शाळा साहित्य, विद्युत साहित्य आणि शाळेत विविध विषयावरील मुलांना व त्यांच्या पालकाना मार्गदर्शन होईल असे कार्यक्रम ठेवणे आदी विषय सभेत ठेवण्यात येणार आहे.
मुख्य म्हणजे शाळेकडे असणारा निधी अपुरा असल्याचे शाळेचे अधीक्षक चौबे यांच्याकडून समल्यामुळेच शाळेच्या सर्व माजी विध्यार्थी व हितचिंतकांना एकत्र येण्यासाठी आवाहन केले आहे. याबाबत शाळेने पत्रही प्रसिद्ध केले आहे. या पत्रनुसार शाळेने दिनांक ७ ऑक्टोबर २०१८ रोजी रविवारी सकाळी ११ वाजता शाळेत मिटिंगसाठी भेटण्याचे ठरविले आहे. शाळेच्या मदतीच्या कार्यात प्रत्यक्ष सर्वानी सहभागी होण्याच्या दृष्टीने सर्व विदयार्थ्यांनी हा संदेश इतर माजी विदयार्थी व हितचिंतकांनी द्यावा असेही म्हात्रे यांनी म्हटले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी राजेश म्हात्रे, गोखले शाळा (१९८१-८२ दहावी ‘ड’ तुकडी ) 9820727675 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.