डोंबिवली : आंतरराष्ट्रीय एस.एन.डी.पी. योगा संस्थेची डोंबिवली शाखा आणि कोपरगांव शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती निमित्त कोपरगावांत स्वच्छता मोहीम राबिविण्यात आली होती. सदर स्वच्छता मोहीम पालिका परिवहन समितीचे माजी अध्यक्ष संजय पावशे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कोपरगांव रिक्षा स्टँड, साऊथ इंडियन हायस्कूल उड्डाणपुल या मार्गावरील रस्ते तसेच शास्त्रीनगर रुग्णालय, उद्यान, बस स्टँड येथील स्वच्छता करण्यात आली. संस्थेचे कार्यकर्ते तसेच शिवसैनिक यामध्ये मोठ्या संखेने सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेत सहभागी लोकांना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. रस्ते, पायवाटा आणि गटारे यामधील कचरा हलविण्यात आला.
यावेळी संजय पावशे म्हणाले कि, संबंधित संस्थेच्या माध्यमातून वैद्यकिय शिबिरे घेण्यात येत असून कोणावर संकट आले तर संस्थेचे पदाधिकारी तत्काळ धावून जातात. वेळोवेळी शिवसैनिक त्यांच्या बरोबर कार्यरत होत असून ‘एकीचे बळ’ यानुसार या प्रभागात चांगले कार्य सुरु आहे. यावेळी महापौर विनिता राणे, माजी स्थायी समिती सभापती तथा स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी स्वच्छता मोहिमेला भेट दिली.