डोंबिवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया या पक्षाचा 61 वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा भव्य सोहळा ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते दुपारी ठाण्याला रवाना झाले.
दरम्यान पुर्वेकडील पाथर्ली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अंकुश गायकवाड यांनी पुष्पहार अपर्ण केला. यावेळी कार्याध्यक्ष किशोर मगरे, सरचिटणीस दिनेश साळवे, उपाध्यक्ष वसंत टेकाळे, दिलीप काकडे, तुकाराम पवार, समाधान तायडे, विठ्ठल खेडकर, सिद्धार्ध खैरनार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अंकुश गायकवाड म्हणाले कि, सर्व समाजासाठी व्यापक असा पक्ष उभारणीचा संकल्प पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले करीत आहेत. त्यांच्या या कार्यात शहरातील तमाम रिपाइं कार्यकर्ते सदैव त्यांच्या पाठीशी राहणार आहेत.