भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यांमध्ये जवळजवळ शंभर ठिकाणी सामाजिक उपक्रम

डोंबिवली : केंद्रात नरेंद्र मोदींच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रविवारी कल्याण जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यांमध्ये जवळजवळ शंभर ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमासाठी कोणतीही बॅनरबाजी न करता कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांना मदत करणे हेच एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विविध ठिकाणी कार्यक्रम करण्यात आले अशी माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली.

भाजपा कल्याण जिल्हातर्फे डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, मोहना, टिटवाळा, मलंगगड या सर्व ठिकाणी रेशन वाटप, सॅनिटायझर वाटप, अनेकांना जेवण, मास्क वाटप तर काही ठिकाणी कुटुंबाला लागणाऱ्या गरजू वस्तू याचे वाटप करण्यात आले.
यानिमित्ताने रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी सहभाग घेतला होता. आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व या ठिकाणी जेवण सॅनिटायझर वाटप मास्क वाटप तसेच काही ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केले. तर खासदार कपिल पाटील यांनीही विविध कार्यक्रमात सहभाग घेतला माजी आमदार नरेंद्र पवार प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले तसेच सर्व नगरसेवक शहराचे अध्यक्ष पदाधिकारी महिला मोर्चा युवा मोर्चा या सर्वांनी आपापल्या परीने आपल्या विभागांमध्ये मदतीचे कार्यक्रम केले. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी शेलार चौक येथील वसाहतीमध्ये हा मदतीचा कार्यक्रम घेतला. भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी स्वच्छ सुंदर जुनी डोंबिवली या स्लोगनखाली तुंबलेली गटारे कार्यकर्त्यांच्या एकत्रित सहभागाने स्वच्छ करून घेतली. गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत धान्य देऊन त्यांना थोडा हातभार दिला. प्रत्येक घराघरात जाऊन लसीकरण किती महत्वाचे आहे, आपल्यासाहित कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे, कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी लस घेतलीच पाहिजे यासाठी आग्रहाची विनवणी करून भाजपच्या सेवाभाव कार्यक्रत खारीचा वाटा उचलला. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही कार्यक्रम आयोजित केले होते त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.