डोंबिवली : सहा महिने संचालक आणि पालक यांच्यामधील गोंधळलेल्या परिस्थितीमुळे शाळा बंद आहे. मी कधीही सांगितले नाही की शाळा बंद करणार, बाकी फी पालक भरत असतील तर शाळा सुरू होईल. जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना शाळेत शिक्षण मिळेल. आम्हाला पण शिक्षकांचा पगार करायचा आहे. कोणत्याही शिक्षकाला कमी केले नाही. शाळेत विद्यार्थी आहेत ते स्टेट बोर्ड प्रमाणेच शिक्षण घेतील त्यामुळे काही गोंधळ झाला असेल तो दूर केला पाहिजे असे वक्तव्य शाळा संचालक शहा यांनी केल्यामुळे आंदोलन स्तगीत केली अशी माहिती आंदोलनकर्त्यानी दिली.
सोमवारी अनोखे प्रतिकात्मक आंदोलन केल्याची बातमी प्रकाशित केल्यानंतर आंदोलन स्थळी शाळा विषयी आमदार राजू पाटील आणि शाळा संचालक शहा यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन शाळा पालक व आंदोलनकर्ते यामध्ये चर्चा झाली. विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड प्रमाणे शिक्षण मिळेल असा विश्वास संचालकांनी दिल्याने आंदोलन स्तगीत केल्याचे सांगण्यात आले.
याबाबत उपस्थित आंदोलनकर्त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया :
संतोष केणे :
जिल्हा परिषदेने शाळा संचालकांना दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे. शाळा व्यवस्थापकांना आता कलेक्टरचा आदेश मान्य करावा लागला आहे. पालकांची आणि ग्रामस्थांची मागणी त्यांना मान्य करावी लागली आहे. संघटित झालेला पालकवर्ग आणि या विभागाचे बांधव यांनी घेतलेल्या गंभीर भूमिकेमुळे न्याय मिळाला आहे.
कॉ. काळू कोमस्कार :
लॉकडाऊन काळात शिक्षण व्यवस्थेत सरकारच्या माध्यमातून अनेक आदेश दिले आहेत की वसुली करू नका पण शाळाचालक बऱ्याच प्रमाणात मुजोरी करतात हे सिद्ध झाला आहे. खर तर शाळा चालकांना नियमात बांधून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ही वेळ आली आहे.
राम म्हात्रे :
अन्याय विरोधात आंदोलन केले. या आंदोलनासाठी कॉ. काळू कोमस्कार आणि ऍड. रामदास वायंगणी यांच्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले. आमची स्टेट बोर्डची मागणी पूर्ण झाली आणि शाळा सुरू होईल याचा आनंद झाला.
उत्तम पवार :
आमची जी मागणी होती दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले पाहिजे ते शाळेतील संचालकांनी मान्य केले आहे. यामुळे आम्हाला व पालकांना आनंद झाला आहे. आम्ही रंगवलेली स्वप्ने साकार होतात त्याचा आज आनंद होत आहे.
प्रवीण कुमारसर :
प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले ते विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी होतं. त्यासाठी मी सहकार्य केले. आज संचालकांनी पालकांची व ग्रामस्थांची मागणी मान्य केली. आता शाळा सुरू होईल 450 विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय करणं हे ठीक नाही. संचालकामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणे बरोबर नाही.