डोंबिवली : नातवाचा वाडी पाचवा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करावा असे प्रत्येक आजोबाचे स्वप्न असते. मात्र आपले समाजाप्रती काही देणे लागते अशी शिकवण नातवाला देण्यासाठी डोंबिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांनी त्यांचा नातू मित पाटील यांच्या हस्ते आनंद नगर- गांधीनगर प्रभागात पाच झाडे लावून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक करत लक्ष्मी मयंकर, राजाराम सोष्टे यांनी आपल्या घरातील लहान मुलांचे वाढदिवस देखील पर्यावरणाचा संदेश देऊन साजरा करू असा संकल्प केला. माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांनी त्यांचा नातू मित पाटील याला सोबत घेऊन प्रभागात ५ वृक्ष लावले यावेळी मितची आई माजी नगरसेविका दिपाली पाटील व वडील स्वप्नील पाटील यांसह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशाच वाढदिवसाच्या निमित्ताने असे सामाजिक संदेश देणारे उपक्रम फार कमी होत असताना दिसतात. मित पाटील यांच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त प्रभागात पाच वृक्ष लावण्याच्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. विशेष म्हणजे प्रभागात हे वृक्ष लावल्यानंतर त्याची जपणूक करण्याचे काम समोरील दुकानदार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनिल मयेकर, डीडी जाधव, श्रीरंग भोसले, श्रीकृष्ण जठार, माणिक गायकवाड, मधुकर पाटील, मणके, रमेश कदम, जेष्ठ नागरिक सदानंद सामंत, संगीता सामंत आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.