आमदार राजू पाटील यांच्या हस्ते अनिल आय हॉस्पिटलचा शुभारंभ

डोंबिवली : मुंबई त्याचप्रमाणे राज्यभर डोळ्यांची निगा कशी घ्यावी याचे मार्गदर्शन देण्यासाठी भ्रमंती करणाऱ्या नेत्रातज्ञ चिकित्सक डॉ. अनघा हेरूर यांच्या अनिल आय हॉस्पिटलचा शुभारंभ मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ग्रामीण विभागातील नागरिकांच्या मागणीनुसार हॉस्पिटलची निर्मिती करणयात आली आहे.

मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, संगणक आदी डिजिटल माध्यमातून नागरिक, तरुण मुले आणि लहानगे अधिक वेळ देत असल्याने डोळ्यांच्या विकारात वाढ होत आहे. शहरात याविषयी अनेक हॉस्पिटल असतात परंतु ग्रामीण विभागात ही सोय नसते. वाहतूक कोंडीमुळे प्रवासात अधिक वेळ खर्ची होत असून नियमित सेवा घेणे सामान्य नागरिकांना कठीण होत असते. डॉ. हेरूर यांच्याकडे नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन आणि पंतप्रधान मोदी यांची ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा द्या या आवाहननुसार डोंविवली ग्रामीण येथे नेत्र चिकित्सा हॉस्पिटल सुरू होत आहे.
सदर हॉस्पिटलचा शुभारंभ शुक्रवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

डोंबिवली येथे सुप्रसिद्ध अनिल आय हॉस्पिटलची उभारणी हेरूर कुटुंबीयांनी अनेक वर्षापूर्वी केली आहे. डोळ्यांच्या विकारांवर उपचाराबाबत अनिल आय हॉस्पिटलला अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त झाला असून त्यामुळे दूरदूर ठिकाणाहून डोळ्यांच्या विकारासाठी रुग्ण येत असतात. लोढा येथे लोकसंख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना त्रास होतो. त्यासाठी येथील नागरिकांनी अनिल आय हॉस्पिटलची शाखा होत आहे.