डोंबिवली : कोरोना महामारीच्या काळात रक्त पुरवठा प्रचंड प्रमाणात कमी आहे. परिणामी तो परिपूर्ण व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबीरे घ्या आणि रक्तदान करा असे आदेश शिवसैनिकांना दिले. त्याचाच भाग म्हणून ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महारक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या शिबिरात डोंबिवलीकर सहभागी होऊन 5 हजार रक्तदाते रक्तदान करणार आहेत.
शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महारक्तदान शिबीर रविवारी ठाणे येथे आयोजित केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून 25 हजार रक्तपिशव्या जमा करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी डोंबिवलीकर रक्तदाते आघाडीव असून तेही रक्तदान ठाणे येथे जाऊन करणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती देतांना डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की, डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून 5 हजार रक्तदाते रक्तदान करणार आहेत. यासाठी पूर्णतः नियोजन झाले असून पदाधिकऱ्यांनी सर्व व्यवस्था तयार केली अशे. रविवारी सकाळ ते संध्याकाळ दरम्यान येथील रक्तदाते त्यांच्या ठराविक वेळेनुसार जाऊन रस्क्तदान करणार आहेत. यासाठी बसची व्यवस्था तसेच त्याच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पदाधिकारी आपल्या टीम बरोबर कार्यरत असून या महारक्तदान मोहीम यशस्वी करण्यासाठी काम करीत आहे.