डोंबिवली : ब्राह्मण समाजातील व्यक्तीने उद्योजक व्हावे आणि नोकरी द्यावी असा उद्देश बाळगणाऱ्या बीबीएन ग्लोबल संस्थेच्या परिवर्तन संमेलनासाठी उपमुख्यमंत्री डोंबिवली येणार असल्याची माहिती संस्थेचे पदाधिकारी जोशी यांनी दिली. यावेळी संस्थेचे सहयोगी संचालक अरविंद कोर्हाळकर, परिवर्तन कॅप्टन महेश जोशी यांच्यासह संघ सदस्य श्वेता इनामदार, विवेक वामोरकर, नितीन इत्रज उपस्थित होते.
महापालिकेच्या डोंबिवली पूर्व येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात १२ व १३ फेब्रुवारी, 2023 रोजी ब्राह्मण जातीच्या उद्योजकांचे संमेलन आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात सुमारे 800 ते 900 ब्राह्मण उद्योजक आपली हजेरी लावणार आहेत. ब्राह्मण जातीच्या बीबीएन ग्लोबल संस्थेच्या या संमेलनासाठी राज्यातील तसेच राज्य बाहेरील ब्राह्मण उद्योजक येणार आहेत. लोकल ते ग्लोबल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला धरून हा उपक्रम काही ब्राह्मण उद्योजकांनी हाती घेतला आहे. अनेक वर्ष अशा प्रकारचे संमेलन घेऊन उद्योजकांच्या उत्पादनाचा प्रचार-प्रसार सर्व दूर व्हावा असा या मागचा संकल्प आहे. या संमेलनाच्या माध्यमातून मोठा ग्राहकवर्गही मिळणार असल्याचा संस्थेचा विश्वास आहे. अनेक राज्यातून येणाऱ्या ब्राह्मण उद्योजकांचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी उपस्थित उद्योजकांना अनुभवायला मिळणार आहे. स्टार्टअप संकल्पनेतून सुरू होणारे उद्योजक आज ग्लोबल मार्केट मिळवित आहेत. त्यांची दर्जेदार निर्मिती आणि ब्रँड यानिमित्ताने सर्वदूर पोहोचणार आहे. उद्योजक बना आणि प्रत्येकाच्या हाताला काम द्या हा संस्थेचा उद्देश या संमेलनाने सार्थक ठरणार आहे असेही पत्रकारांशी बोलताना सांगण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी जोशी यांनी सांगितले की, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी असून त्यांनी ब्राह्मण उद्योजकांचे जागतिक बिजनेस नेटवर्क या माध्यमातून सर्वांसमोर आणले आहे.