डोंबिवली : रस्त्यावर फिरतांना उन्हाचे चटके बसत असून अंगाची लाहीलाही होत असते. सध्या वाहतूक पोलीसांनी उन्हाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील नो पार्किंग मध्ये लावलेली वाहने टोईंग व्हॅन पोलीस कर्मचाऱ्यारी हटवित असतात. मात्र अशा वेळी उन्हाचा बचाव व्हावा म्हणून टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी नवी शक्ल लढवीत जुन्या मोठ्या बॅनर उपयोगात आणले आहेत. टोईंग गाडीवर असे मोठे फलक बांधून कर्मचाऱ्यांनी आपला बचाव केला आहे.
शहरातील वाहतूक व्यसस्था सुरळीत रहावी म्हणून वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष सतत कार्यरत असते. वाहतूक कोंडी होऊन काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून अगदी कमी वाहतूक पोलीस क्षमतेतही कार्य सुरू आहे. नो पार्किंग मध्ये काही वाहनचालक गाड्या पार्किंग करतात त्यांच्या वाहनावर पोलीस कर्मचारी कारवाई करत असतात. शहरात पूर्वेकडे एक वाहतूक नियंत्रण कक्ष आहे. दोन अधिकारी आणि 25 पोलिसांच्या मर्यादित क्षमतेवर कामकाज सुरू आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून चौकाचौकात पोलीस कार्यरत आहेत. मुख्य वाहतूक कक्ष अंतर्गत फक्त दोन टोईंग गाड्या असून त्यांच्या मार्फत पूर्व आणि पश्चिम विभागातील नो पार्किंग मधील गाड्या उचलल्या जातात. साधारणपणे एका फेऱ्यामध्ये सहा-सात गाड्या उचलल्या जातात. सकाळच्या वेळेत 5 आणि संध्याकाळच्या वेळेत 5 अशा फेऱ्या होत असून सुमारे 70 ते 80 दोन चाकी गाड्यांवर कारवाई होते. महिन्याचा विचार केला 250 दुचाकी गाड्या पोलीस उचलतात. अशा या कार्यतत्पर कर्मचाऱ्यांना मात्र उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा मोसमात कामे करावे लागते. मात्र टोईंग व्हॅन छप्पर नसल्याने काही तरी वेगळी तजवीज करावी लागते. काही वेळा उचलल्या दुचाकी गाड्या संभाळून ठेवण्यासाठी रस्त्यावर दोऱ्यांनी बांधून ठेवाव्या लागतात. ज्यावेळी दुचाकी मालक वाहतूक नियंत्रण कशात आल्यावर मग रितसर पावती (चलान) केल्यावर दोरीत गुंफलेली दुचाकी त्याला मालकाला परत देण्यात येत. ही परिस्थिती फार केविलवाणी असून नो पार्किंगमधील जमा करण्यात असलेल्या गाड्यांसाठी एक वेगळे वाहनतळ दिले पाहिजे असे खाजगीत लोकं बोलत आहेत. पूर्वेकडील रामनगर पोलीस ठाणे मागील जागा अशा उचललेल्या गाड्या ठेवण्यासाठीही वापरण्यात येत असून ती जागाही कमी पडत आहे. सबब वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष कार्यभार विषयी वाहतूक वरीष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्याशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.