राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील आणि युवक अध्यक्ष, ठाणे सुधीर पाटील यांचा राजीनामा !

डोंबिवली : पद्मविभूषण तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा. अन्यथा आम्ही सुद्धा कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष, ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष, कल्याण डोंबिवली युवक अध्यक्ष राजीनामे देत आहोत. साहेब, खूप कार्यकर्ते भेटत आहेत आणि रडून व्यथा मांडत अशा विषयाचे राजीनामा पत्र खुद्द शरदचंद्र पवार यांना दिले असल्याचे डॉ. वंडार पाटील यांनी सांगितले.

शरदचंद्रजी पवार यांना पाठविलेल्या या राजीनाम्यामध्ये डॉ. वंडार पाटील यासनी असे नमुद केले आहे की, मी माझी राजकीय कारकीर्द आपल्या सोबत चालू केली तेव्हापासूनच आपल्यालाच मी माझ्या राजकारणातील गुरू म्हणून मानलेले आहे. मधल्या काळात मला आणि माझ्या कुटुंबीयांना पक्षांतराबाबत खूप त्रास दिला गेला. (माझ्या मुलाची हत्या केली) तरी सुद्धा मी आपल्या सोबत राहून आपल्याच पक्षाचेच काम केले. आदरणीय साहेब, आज आपण जर पक्ष अध्यक्षता राजीनामा दिला तर आमचा जाणता राजा कोण ? त्यामुळे आपण आपला घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा. अन्यथा आम्ही सुद्धा कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून डॉ. वंडार पाटील, ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून सुधीर पाटील आणि कल्याण डोंबिवली युवक अध्यक्ष
म्हणून राज मच्छिंद्र जोशी राजीनामे देत आहोत. साहेब खूप कार्यकर्ते भेटत आहेत आणि रडून व्यथा मांडत आहेत. किती जणांना आम्ही शांत करावे आपण त्वरित निर्णय मागे घ्यावा ही विनंती.