( आंदोलकांची सुतिकागृह नुतनीकरणा मागणी )
डोंबिवली : पूर्व विभागात होणाऱ्या सुतिकागृहाला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, केएम रुग्णालय धर्तीवर डोंबिवली शहरातील सुतिका गृहाचे तात्काळ नुतनीकरण करा. सुतिकागृहाच्या नुतनीकरण सेवेसाठी पालिका प्रशासनाने आणलेले पीपीपी तत्व रद्द करून त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने घ्यावी. सर्व सुविधा सुपर स्पेशालिस्ट सारख्या असणाऱ्या रुग्णालयाची निर्मिती करावी आदी मागण्यासाठी गुरुवारी वंचीत बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
डोंबिवली पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेशभाई, नंदा ढेकळे, डोंबिवली शहर माजी अध्यक्ष सुरेंद्र ठोके, उपाध्यक्ष राजु काकडे, डोंबिवली शहर उपाध्यक्ष ऍड. मिलिंद साळवे, अर्जुन केदार, बाजीराव माने, भालेराव, निलेश कांबळे, दत्ता शेळके, अशोक गायकवाड, संतोष खंदारे, विजय इंगोले, आशा ठोके, शिला कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते. सहायक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आपल्या मागण्या पालिका आयुक्तांपर्यत पोहचवू असे आश्वासन आंदोलकांना दिले.
