गणेशोत्सवातून सामाजीक बांधलकी :
आदीवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

डोंबिवली : डोंबिवली जवळील काटई गावातील सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांचे घरी पाच दिवसांच्या घरगुती गणेशोत्सव साजरा होतो. या दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांकडून शैक्षणिक साहित्याची भेट बाप्पासमोर भक्त अर्पण करतात. हे सर्व जमा झालेले सर्व शैक्षणिक साहित्य कर्जत तालुक्यातील (जि.रायगड) सुगवे गाव व या गावाच्या लगतच असलेल्या पिंगळेवाडी व सराईवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील २५० आदीवासी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. गजानन पाटील यांचा हा उपक्रम गेली आठ वर्षे सुरू आहे.

हे शैक्षणिक साहित्य वाटपावेळी शिक्षण प्रेमी गणेश पाटील (संदप), महेश संते (उसरघर), फुलचंद पाटील, मनोहर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, युवराज पाटील (काटई), जादूगर राम पाटील (कोळे), विश्वनाथ म्हात्रे, हेमंत म्हात्रे (देसाई), गिरीधर पाटील, प्रकाश पाटील (निळजे), मधुकर माळी, शिवाजी माळी, कमलाकर पाटील (भोपर), सुभाष पाटील, कर्सन पाटील (घारीवली), उदय मुंडे (आगासन), मंगेश खुटारकर, शशिकांत पाटील (डायघर) व सुनिल पाटील (सोनारपाडा) आदी उपस्थित होते.

सदरील शैक्षणीक साहित्य वाटपाकरीता सुगवे गावातील प्रतिष्ठित नागरीग ॲड् भूपेश पेमारे साहेब, या शाळेचे मुख्याध्यापक तानाजी गवारी सर, पिंगळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बुरुड सर, सराईवाडी शाळेचे मुख्याध्यापक शिवराम सानप सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शैक्षणिक साहित्य वाटप करण्यापूर्वी उपस्थित शाळकरी विद्यार्थ्यांसमोर आगरी समाजातील प्रसिद्ध जादूगर राम पाटील (कोळे गाव) यांनी अनेक जादूचे प्रयोग केले. विज्ञानाचा वापर आणि गमतीजमती दाखवून १० ते १५ जादूचे प्रयोग त्यांनी केले.

दूर्गम आदीवासी पाड्यातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच अशा गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल हा या मागचा मुख्य उद्देश या उपक्रमा मागील आहे असे गजानन पाटील यांनी सांगितले.