डोंबिवली : शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न नेहमीच ऐराणीवर आहे. इमारत कधीही कोसळेल याचा भरवसा नसला तरी त्या इमारत मधील भाडेकरू घर सोडण्यास तयार होत नाही. कारण दुसरा कसलाच आधार नसतो. परिणामी अशा दुर्घटनेत काही वेळा मनुष्यहानी होते. कोपरगावात अशीच एक धोकादायक इमारत कोसळली मात्र यामध्ये जीवितहानी झाली नाही. या घटनेत पालिका अधिकारी, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन राजकीय व्यक्ती तसेच डोंबिवलीकर धावत येऊन मदत केली आणि आधार दिला. या सर्वांचे इमारत मालक संजय पावशे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
याविषयी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी परिवहन सभापती संजय लक्षण पावशे हे त्या कोसळलेल्या धोकादायक इमारतीचे मालक आहेत. चार दिवसांपूर्वी दुपारी ती धोकादायक इमारत कोसळली तेव्हा पावशे यांची यांची मनःस्थिती खूपच व्याकुळ होती. या घटनेत नशिबाने साथ दिल्यामुळेच कोणीही व्यक्ती दगावली नाही. दरम्यान इमारत कोसळेल याचे संकेत मिळाल्याने कोसळण्यापूर्वीच काही लोकांचे मौल्यवान सामान त्या इमारतीतून बाहेर काढण्यात आम्ही सर्वजण यशस्वी झालो. आमच्या गरीब भाडेकरूंचे समान त्यांना सुखरूप मिळसल्याचा एक आनंद होताच पण त्याबरोबर इमारत कोसळली याचं दुःखही मोठं होत असे संजय पावशे सांगतात. या कठीण परिस्थितीत पालिकेच्या अधिकारी कर्पे मॅडम आणि त्यांचे इतर सहकारी, आमचे शिवसेना नेते रमेश म्हात्रे, भाजपाचे पवन पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे नेते-पदाधिकारी सर्वांनी या कठीण प्रसंगात मदत केली. अग्निशमन जवान, पोलीस प्रशासन सर्वांनी भरपूर मदत केली. इमारतग्रस्त काही कुटुंबाला तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे उपकार न फिरणारे आहे असेच प्रेम असू दे असेही संजय पावशे यांनी आभार व्यक्त करून सांगितले.
