शासकीय योजनांची माहिती घेण्याण्यासाठी डोंबिवलीत तरुण उत्साही

( नवीन उद्योग ठरतोय तरुणांचे आकर्षण )

डोंबिवली : शासनाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिकेने कल्याण डोंबिवलीत `शासन आपल्या दारी योजना` असा कार्यक्रम सुरु ठेवला आहे. देशातील तरुण पिढीने शासनाच्या योजनातून व्यवसायिक कौशल्यातून पुढे जावे याकरता  अनेक योजना आहेत. या योजनांची माहिती मिळू शकते. डोंबिवली पश्चिमेकडील विजय सोसायटी येथे सुरु असलेल्या या कार्यक्रमात या योजनांची माहिती घेण्यासाठी डोंबिवलीकरांनी तरुणांनी गर्दी केली होती.

यावेळी कॉंग्रेस माजी नगरसेवक नंदू म्हात्रे , शिवसेना ( शिंदे गट ) शाखाप्रमुख प्रताप पाटील, अंकित जाधव यांसह शिवसेना पदाधिकारी, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीवर्ग उपस्थित होते. यावेळी शाखाप्रमुख प्रताप पाटील म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे आज सर्व नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळत आहे. याचा लाभ नागरिकांना होणारआहे. कॉंग्रेसचे माजी नगरसेवक नंदू म्हात्रे म्हणाले, वर्षभर या योजनांची माहिती नागरिकांना मिळावी. या योजनांची माहिती नागरिकांना मिळावी याकरता `शासन आपल्या दारी` उपक्रम चांगला आहे. यावेळी आधार राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र महाव्यवस्थापक डॉ.अमित दुखंडे म्हणाले. या केंद्राच्या माध्यमातून या शासकीय  योजन यावर्षी  साडे चार हजार पेक्षाही जास्त घरात यशस्वी झाल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसामान्यांना रोजगार व स्वंंयरोजगार प्रशिक्षण देऊन आर्थिक सक्षमीकरणाकडे वळविण्यास यश मिळाले. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानतो.  लाभार्थी स्वरांगी बिजरे हिने  या उपक्रमात उपस्थित राहून तरुणांनी शासकीय योजनांंच्या माध्यमातून आपले करीयर बनविले पाहिजे असे सांगितले.