डोंबिवली : शहरातील प्रसिध्द पै फ्रेंड लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी डोंबिवलीकर नागरिकांना वह्यांची कोरी पानं आणून द्या असे आवाहन केले होते. या आवाहनास लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्या कोऱ्या पानांच्या वह्या तयार झाल्यानंतर त्या वह्यांचे मोफत वितरण आज बुधवारी गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले. पुंडलिक पै यांच्या अशा विविध उपक्रमाला लोकांची साथ मिळत असल्याने पै फ़्रेंड लायब्ररी शहरात चर्चेचा येत आहे.
पै फ़्रेंड लायब्ररीचे पुंडलिक पै यांनी मे महिन्यात डोंबिवलीतील नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांकडील वह्यांचे कोरी पानं आणून देण्याचे आव्हान केले होते. जवळपास २०० नागरिकांनी वह्यांची कोरी पानं पै फ्रेंड्स लायब्ररीच्या विविध शाखांमध्ये जमा केल्या. या पानांचे ठाकुर्ली येथील शैलेंद्र पोफळे यांनी काहीही मोबादला न घेता त्या कोऱ्या पानांची रीतसर बांधणी करून दिली. या उपक्रमातून सुमारे पाचशे वह्यांची निर्मिती झाली आहे. टाकाऊतून टिकावू निर्मिती झाल्याने पुंडलिक पै यांनी समाधान व्यस्त केले आहे.
या वह्या गरजू विद्यार्थ्यांनाच दिल्या जाव्यात या उद्देशाने डोंबिवली शहरात सामाजिक क्षेत्रात काम विंदा भुस्कुटे यांच्या परिचयातून डोंबिवली जवळील माणगाव जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना बुधवारी त्या वह्या मोफत वाटप करण्यात आल्या. पुंडलिक पै यांच्या अशाच आदान-प्रदान पुस्तक उपक्रमालाही भरघोस पाठिंबा मिळाल्याने लाखो पुस्तके जमा होऊन त्याची नोंद गिनीज बुकात झाली आहे. कोऱ्या पानापासून वह्या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष असून हा उपक्रम पुढेही करू असे पुंडलिक पै यांनी सांगितले.