डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 ला स्पर्धकांचा तुफान मोठा प्रतिसाद

डोंबिवली : ऑगस्ट महिन्यातील पहिला दिवस जगभरात फ्रेंडशिप डे (मैत्री दिन) म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून पहिल्यांदाच डोंबिवलीत डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 उपक्रम आयोजित करण्यात आला. ज्याप्रमाणे डोंबिवलीत जशी गुढीपाडवा शोभायात्रा सुरू झाली त्याप्रमाणे कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला. फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने डोंबिवलीमध्ये प्रथमच आयोजीत करण्यात आलेल्या अशा हाऊसफुल्ल कार्यक्रमाला म्हणजेच डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 ला स्पर्धकांचा तुफान मोठा प्रतिसाद मिळाला.

कॅबिनेटमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार तसेच कल्याण डोंबिवली रनर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला होता.

मॅरेथॉनमध्ये सहभागी आतुरतेने वाट पाहणाऱ्या लहानग्यासाठी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४ आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सेमी मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे तीन हजार पाचशे धावपटूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या आबालवृद्धांचाही मोठा उत्साह दिसून आला. स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे १.६ किमी लांबीच्या फन रनमध्ये आयोजक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आनंदाने सहभाग घेतला. पूर्वेकडील आप्पा दातार चौक ते घारडा सर्कलापर्यंत या सर्वांनी दौड केली त्यामुळे इतर स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला.

स्पर्धेतील सहभागी प्रत्येक खेळाडूला ई-सर्टिफिकेट आणि मेडल तसेच सहभागी शाळा, संस्थांना मोमेंटो देण्यात आले. कॉमनवेल्थ गेम्समधील ब्राँझ मेडल विजेत्या, अर्जुन क्रीडा पुरस्कार, शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार आणि आदिवासी खेलरत्न पुरस्कार विजेत्या एथिलीट कविता राऊत आणि सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
एक नवी चळवळ आहे असे आयोजक रविंद्र चव्हाण यांनी सांगून सर्वांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन ही अभिनव संकल्पना राबवणारी कल्याण-डोंबिवली रनर्स ग्रुप ही मॅरेथॉनप्रेमी तरुण-तरुणींची ही संस्था गेल्या ९ वर्षांपासून असे उपक्रम करीत आहे.