माजी आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते हेल्थकेअर कार्डचे लोकापूर्ण

70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम :

डोंबिवली : शहरातील अभिनव सहकारी बॅंकेचे चेअरमन तथा माजी आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी केअर १ इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (आर आर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर) येथे हेल्थकेअरकार्डचे लोकार्पण करण्यात करण्यात आले. केअर १ इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (आर आर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर) संलग्न आर आर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून ७० वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांना आपल्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी सुविधाजनक हेल्थकेअर कार्ड उपयोगी पडणार आहे. यावेळी डॉ. मंगेश पाटे, डॉ. अर्चना पाटे, विकी पाटील, अरुण जांभळे, कोमल निग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. मंगेश पाटे म्हणाले, हेल्थ केअर कार्ड।७० वर्षांवरील नागरिकांना मोफत देण्याची सुरुवात झाली. माजी आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व नागरिकांसाठी तब्बल ७० तपासण्या मोफत करण्यात आल्या. त्यांनी पुढे सांगितले की, माजी आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा असलेले हेल्थ केअर कार्डचे लोकपूर्ण करण्यात आले. सर्व सामान्यांना परवडणारी आरोग्य व्यवस्था या संकल्पनेतून हे रुग्णालय सुरु केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना अनेक आरोग्यविषयी समस्यांना समोर जावे लागते. जेष्ठ नागरिकांच्या या समस्या सोडविण्यासाठी हेल्थ केअर कार्ड उपयोगी ठरेल. या रुग्णालयात जेष्ठ नागरिकांचे रजिस्टेशन करून हे कार्ड मोफत देत आहोत. हेल्थ केअर कार्डच्या माध्यमातून या रुग्णालयातील सर्व वैद्यकीय सुविधामध्ये सवलत दिली जाणार आहे. हि सवलत आर आर पाटील ट्रस्टच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय उपचारावरील खर्चाचा भार हा 25 ते 40 टक्क्यापर्यत कमी करत आहोत. ज्येष्ठ नागरिकांची रक्त तपासणीसाठी डोमेस्टिक सर्व्हिस सुरु केली असून आमच्या रुग्णालयाकडून ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन रक्त तपासणी केली जाणार आहे. त्याकरिता या रुग्णालयात रजिस्टेशन करावे लागणार आहे. रक्त तपासणीचे रिपोर्ट देखील त्यांच्या घरी दिले जातील. ज्येष्ठ नागरिकांना औषधांची गरज भासल्यास आम्ही दिलेल्या एका नंबरवर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची माहिती पाठविल्यास ते औषध 30 ते 60 मिनिटात घरी पोहचते केले जाईल. हेही आम्ही सवलतीच्या दरात देत आहोत. या अशा अनेक लोकपयोगी योजना माजी आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त सूरू केल्या आहेत.