डोंबिवली : भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडल तर्फे श्रावणी शनिवार निमित्ताने श्रीसत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती. यावेळी भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष समीर रमेश चिटणीस यांनी श्रीसत्यनारायण महाराजांची सपत्निक मनोभावे पुजा केली.
श्रीसत्यनारायण महाराज पूजेचे दर्शन व प्रसादासाठी कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी
कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशीकांत कांबळे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर परब, कल्याण जिल्हा सरचिटणीस अमित धाक्रस
डोंबिवली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रज्ञेश प्रभुघाटे, डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष सूर्यकांत माळकर, डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मुकुंद (विशु) पेडणेकर, माजीनगरसेवक विकास म्हात्रे, मंदार हळबे, संदीप पुराणिक यांच्यासह डोंबिवली पश्चिम मंडलाचे सर्व पुरुष, महीला, युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.
भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष समीर रमेश चिटणीस यांनी सर्व मान्यवरांना तिर्थप्रसाद देऊन त्यांचे स्वागत केले.