शिवसेना मध्यवर्ती शाखेत भरला आमदार राजेश मोरे जनता दरबारात :

नागरिकांचे प्रश्न समस्या ऐकून त्या सोडविण्याचे आश्वासन

डोंबिवली : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात संपल्यानंतर ताबडतोब कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या व प्रश्न ऐकून घेतले. तुमचे प्रश्न सोडविण्याचा निश्चित प्रयत्न करेन असे आश्वासनही दिले. विधानसभेत शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी पाणी प्रश्न मांडला होता. पहिल्यादा अधिवेशनात आमदार मोरे जनतेचे प्रश्न उपस्थित केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

सोमवारी डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेत आमदार मोरे यांनी जनतादरबाराच्या माध्यमातून आपल्या विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. 27 गावे, 14 गावे व दिवा शहरात पाणी प्रश्न बाबत हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील पाणी प्रश्न नक्की सोडवतील असा मला विश्वास आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने अमृत योजनेचे काम सुरु असून लवकरच पाणी समस्या दूर होईल असे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले.

दरम्यान नुकत्याच घडलेल्या एका घटनेचा हवाला देत त्यांनी सांगितले की, मराठी माणसाला त्रास होणार असेल तर ऐकून घेणार नाही. कल्याण मध्ये मराठी कुटुंब मारहाण प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. तसेच डोंबिवली एमआयडीसीतील घातक रासायनिक केमिकल कारखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी करूनही कारवाई होत नाही, त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व विषारी धूर व गॅस सोडणाऱ्या रासायनिक कारखान्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बंडू पाटील, विवेक खामकर, दत्ता वझे, विकास देसले, शीतल लोके, कविता गावंड, शिल्पा मोरे, अस्मिता खानविलकर, वैभव राणे,उमेश शेलार, आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.