देवदर्शना बरोबर समस्यांसाठी भेटीगाठी:
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी ग्रामीण भागातील जटील पाणी प्रश्न सोडविणार असे आश्वासन दिले होते. त्यानुसार ताबडतोब आमदार मोरे यांनी आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावाही केला. त्यांच्यामुळे संदप गावातील पाणी प्रश्न आता निश्चितपणे सुटणार आहे. काल शनिवारी श्री दत्तजयंती निमित्त संदप गावात श्री दत्तात्रयाचे दर्शन घेतल्यानंतर मोरे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. काय – काय समस्या आहेत त्या याचवेळी अमृत योजनेचे प्रोजेक्ट व्यवस्थापक चेतन मोरे यांच्याकडून माहिती करून घेतल्या. त्यानुसार आता हा प्रश्न तत्काळ सुटणार असल्याने ग्रामस्थांनी मोरे यांचे आभार मानले.

संदप आणि जवळील गावातील पाणी प्रश्न काही तांत्रिक अडचणी दूर केल्यास सुटणार आहेत. आमदार मोरे यांनी प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत होईल उद्याच कामाला सुरुवात नक्की होईल त्यासाठी अधिकाऱ्यांना त्यांच्या खास गोडगुलाबी शैलित काम करण्याच्या पद्धतीची माहिती आणि बरोबर निर्देश दिले. अधिकारी वर्गाला मोरे यांच्या पालिकेतील सहकारिता पद्धतीच्या कामाच्या माहितीमुळे त्यांनीही सर्व समस्या निकाली निघतील असे सांगितल्याने गांवकऱ्यांचे समाधान झाले.

दरम्यान आमदार राजेश मोरे यांनी भोपर देसले पाडा येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मयुरेश्वर मंदिरात दत्तजयंतीनिमित्त जन्मोत्सवात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांचा संध्याताई अमृते यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.

. आमदार मोरे यांनी मंदिरात सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे भोपर गावात शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला. पाटील यांच्या निवास्थानी आमदार मोरे यांनी श्री दत्त देवाचे दर्शन घेतले. तर खोणी गावातील माजी सरपंच हनुमान ठोंबरे यांच्या निवासस्थानी आमदार मोरे यांनी श्री दत्ताचे दर्शन घेतले.


खोणी गावात श्री नवनाथ महाराजाचे भव्य मंदिर उभारले जात असून यासंदर्भात हनुमान ठोंबरे यांनी माहिती दिली. यावेळी नवनाथ पाटील (शिवसेना विभाग संघटक ), मारुती ठोंबरे ( शाखाप्रमुख ) आदी उपस्थित होते.
आमदार मोरे यांनी गावाकऱ्यांशी पाणी प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी अमृत योजनेचे प्रोजेक्ट व्यवस्थापक चेतन मोरे यांना बोलावून गावातील पाणी प्रश्न कशाप्रकारे सुटेल याची माहिती घेतली. चेतन मोरे यांनी सांगितले की, संदप गावापर्यत आलेल्या पाण्याच्या लाईनमध्ये प्रेशर कमी आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पालिका प्रशासनाने नविन लाईन टाकल्यास पाणी प्रश्न सुटेल. यावर आमदार मोरे यांनी पालिका प्रशासनाकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले.

आमदार मोरे यांच्या प्रयत्नाने संदप गावातील पाणी प्रश्न सुटणार असल्याने येथील गावकऱ्यांनी आमदार मोरे यांचे आभार मानले. लोढा ग्लोबल पार्क मधील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर येथेही पाणी प्रश्न गंभीर आल्याचे आमदार मोरे यांना समजले. तात्काळ आमदार मोरे यांनी पालिका प्रशासनातील पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून येथील पाणी प्रश्न लवकरात सोडवावा असे निर्देश दिले. यावेळी विलास देसले हेही उपस्थित होते.