शपथ घेऊ या, मुदत बाह्य, उरलेली व न वापरलेली औषधांने होणाऱ्या पर्यावरणाची हानी  टाळू या

( जगन्नाथ ( आप्पा ) शिंदे यांचे आवाहन )

डोंबिवली : मुदत बाह्य, उरलेली व न वापरलेली औषधांचे संकलन व त्याचे शास्त्रीय विल्हेवाट लावणे करिता टेकबॅक या कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमात अखिल भारतीय तसेच महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा ) शिंदे यांनी ‘शपथ घेऊ या,मुदत बाह्य, उरलेली व न वापरलेली औषधांने होणारी पर्यावरण हानी टाळू या’ असे आवाहन नुकतेच कल्याण येथील केमिस्ट भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात केले.

अखिल भारतीय तसेच महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या हस्ते पर्यावरण वाचवूया – औषधांचा गैरवापर टाळूया ! या संकल्पनेतून मुदत बाह्य, उरलेली व न वापरलेली औषधांचे संकलन व त्याचे शास्त्रीय विल्हेवाट लावणे करिता टेकबॅक या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी ठाणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष देशमुख- सचिव व पदाधिकारी प्राध्यापिका मंजिरी घरत, सागर कुलकर्णी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सेंट्रल ट्रक स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन द्वारे नुकतेच मे 2025 मध्ये सर्व राज्यांच्या औषध नियंत्रकांना एक्सपायर तसेच न वापरलेल्या औषधांचे शास्त्रीय विल्हेवाट लावण्याकरिताचे परिपत्रक आणि विस्तृत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका यांच्यासोबत केमिस्ट असोसिएशनच्या सहभागातून पर्यावरणाला तसेच समाज आरोग्याला घातक ठरणाऱ्या एक्सपायर व शिल्लक औषधींच्या शास्त्रीय विल्हेवाट करणे विषयीच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन हे प्रत्येक केमिस्ट सभासदाकडे ग्रीन ड्रॉप बॉक्सची सोय ग्राहकांकरता करणार आहे.

दरम्यान अध्यक्ष शिंदे म्हणाले, मुदत बाह्य औषधांचे संकलन कार्यक्रम गेल्या वर्षीच म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये राज्य संघटनेने आपल्या पश्चिम महाराष्ट्र झोन मधून कोल्हापूर व आसपासच्या भागात पहिल्या टप्प्यात सुरू केलेला आहे.त्यानंतर आता याची राज्यभर व्याप्ती वाढवत ठाणे जिल्ह्यातून केमिस्टचा सक्रिय सहभाग व महानगरपालिकांच्या बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट टीम बरोबर संयुक्त प्रकल्प राबवला जाणार आहे.

कल्याण शहरात सुमारे 800 व ठाणे जिल्ह्यात जवळपास 5000 औषध मेडिकल दुकाने आहेत. या प्रत्येक मेडिकल दुकानांमध्ये एक ग्रीन ड्रॉप बॉक्स देऊन येणाऱ्या ग्राहकांकडून मुदतबाह्य औषधांचे संकलन करण्याचा संकल्प असोसिएशनने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून केला आहे.