( डोंबिवलीत मनसैनिकांची सरकारवर टीका )डोंबिवली : मीरा-भाईंदर परिसरात मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळून एक मोठा पाऊल उचलले आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या या संघटनांनी स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवर थेट आरोप केले आहेत. याबाबत डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकावर नाराजी व्यक्त करत मराठी भाषिकांचा मोर्चा शांतनेने सुरु असताना पोलिसांनी ताब्यात घेण्याची आवश्यक नव्हती. मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राकरता मनसेने रस्त्यावर उतरणारच असे पत्रकारांना सांगितले.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर , जिल्हाअध्यक्षा दीपिका पेडणेकर, डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत, महिला शहराध्यक्षा मंदा पाटील उपजिल्हाध्यक्ष सुदेश चुडनाइक, विधानसभा सचिव उदय वेळासकर, उपशहराध्यक्ष प्रेम पाटील, शहर संघटक सुमेधा थत्ते, निशाद पाटील, श्रीकांत वारंगे ,विभाग अध्यक्ष, संजय चव्हाण, हेमंत दाभोळकर, रवी गरुड ,प्रदीप चौधरी,,विशाल बढे ,रतिकेश गवळी,कदम भोईर,परेश भोईर,भाग्येश इनामदार प्रणव केनेकर, विनायक नवरे, उपशहरअध्यक्षा श्रद्धा किर्वे, नीलिमा भोईर, मनाली पेडणेकर, ममता आपटे, विभाग अध्यक्षा शलाका कानडे, अंजना भोईर, शाखा अध्यक्षा मेघा चोरगे,अर्चना गायकवाड, सुप्रिया पालांडे अनुपमा दळवी,ज्योती खवसकर, वंदना मोरे, प्रिया कडू, शिवानी दळवी, वंदना कांबळे, सुचित्रा नाईक आदी मनसैनिक मनसे शाखेत आले असता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.