डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या कोपरच्या पादचारी पूलाची दुरुस्ती करण्याचे आदेश

डोंबिवली, दि. ०४ (प्रतिनिधी) : चाळीस वर्षापूर्वी डेंबिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या कोपर येथील पूलाची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त आयुक्त वेलारासु यांनी दिले. महापालिकेने तातडीने पूलावर आलेले गवत, झुडपे काढण्याचे काम तातडीने सुरु केले असून स्ट्रक्चरल ऑडिटर माधव चिकोडी यांन पूलाचे पुन्हा ऑडिट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

यासंदर्भात बातम्यांची दखल आयुक्त वेलारासू यांनी घेऊन पूलाची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात माधव चिकोडी याना विचारले असता ते म्हणाले, २००१ मध्ये या पूलाचे असेच ऑडीट करण्यात आले होते व तेव्हाही काही सूचना करण्यात आल्या होत्या.त्यानंतर दर तीन ते पाच वर्षानी ऑडिट होण्याची गरज असून पूलावरील पायाचा निचरा होण्यासाठी योग्य त्या सुविधा करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पूलावर खडडे पडले आहेत त्यावर पाणी साठते व ते खाली झिरपते. व आतील लोखंडी सळ्या, खिळे गंजतात व पूल कमकुवत होतो. पूलाखाली जो कव्हरचा भाग (प्लास्टर) पडत आहे तो भाग त्वरित काढले पाहिजे. तसेच पूलावर जाहीरातीचे फलक लागतात त्याने वजन वाढते व पूल कमकुवत होतो. मोठया संकटातून सुटका करण्यासाठी पूलाचे ऑडिट वेळोवेळी केले पाहिजे असे सांगून पडणारा भाग (प्लास्टर) त्वरीत काढले पाहीजे असेही ते म्हणाले.

महापालिकेचे उपअभिंयता प्रशांत भुजबळ यांना विचारले असता त्यानीही आयुक्तांनी पूलाची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिल्याचे मान्य केले. आजपासूनच पूलावरील गवत, झुडपे काढण्याचे काम सुरु करण्यात आले असून माधव चिकोडी यांना पूलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची विनंती करण्यात आल्याचे सांगितले.