डोंबिवली : येथील महाराष्ट्रनगर येथे युग फौंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन महानुभाव पंथाचे महंत सागर मुनिदादा (तळेगांवकर) यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर, समाजसेवक दयानंद किरतकर, युगंधर किरतकर, उद्योजक किरण दरबारे, अॅड मनोज निकोसे, तृष्णा पराग वाघमारे, मनोज किरतकर यांसह विविध बचतगटातील व महिला मंडळाचे पदधिकारी उपस्थित होते.
बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. कल्पना किरतकर यांना सामाजिक कार्यात आवड निर्माण झाल्याने त्यांनी युग फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधलकी जपण्यासाठी व नागरिकांना समस्या सोडविण्यासाठी कार्यालय सुरु केले आहे. महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण, स्वयंरोजगार प्रशिक्षण, महिलांविषयी शासकीय योजनांची माहिती, प्रत्यक्ष योजनाचा लाभ, अध्यात्मिक कार्यक्रम, कला, संस्कृतिक कार्यक्रम, बचत गटांची बांधणी, महिलांना रोजगार मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम युग फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर यांनी सांगितले. यावेळी पराग वाघमारे, निर्मिती महिला व्यासपीठाच्या निर्मला पिंगळे, मनिष शिखरे, स्मिता शिंदे, आम्रपाली बचत गटाच्या लता मोहिते, सुकेशनी बचत गटाच्या रचना चासकर, रविकिरण बनसोडे, अनुराधा मोहिते आदि उपस्थित होते. डोंबिवलीतील विविध समाजिक संस्था, महिला मंडळ बचत गट, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कल्पना किरतकर यांना सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. कल्पना किरतकर यांनी सामाजिक कार्यात आवड निर्माण झाल्याने त्यांनी युग फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधलकी जपण्यासाठी व नागरिकांना समस्या सोडविण्यासाठी कार्यालय सुरु केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.