वातानुकूलित व्यायामशाळेचे उद्घाटन

डोंबिवली : कोळे गावात सर्व पक्षीय युवा मोर्चा, कोळेगाव विकास प्रतिष्ठान व कोळे ग्रामस्थांच्या सहकार्याने वातानुकूलित व्यायामशाळेचे उद्घाटन सोमवार दिनांक २४ रोजी कोळे गावातील गणेश विसर्जन घाट जवळील जून्या पडीक वास्तुचे नुतनीकरण करून संतोष केणे व गणेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्षीय युवा मोर्चा व कोळेगाव विकास प्रतिष्ठान, कोळे ग्रामस्थांच्या सहकार्याने अद्ययावत वातानुकूलित भव्य व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले.

सदर व्यायामशाळेचे उद्घाटन माजी आमदार रमेश पाटील तसेच विद्यमान आमदार सुभाषजी भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती संतोष केणे, गणेश म्हात्रे, एकनाथ पाटील, किरण ठोंबरे, योगेश म्हात्रे, नेताजी पाटील, सुखदेव पाटील, सोमनाथ पाटील, स.प.युवा मोर्चाचे गजानन पाटील, तकदीर काळण, सुभाष पाटील, प्रेमनाथ पाटील, गिरीधर पाटील, निवृत्ती पाटील, प्रकाश पाटील, रवि पाटील आदी उपस्थित होते.