डोंबिवली : पूर्वेकडील उस्मा आणि टेक्नो पेट्रोल पंपावर बुधवारी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल-डिझेल इंधन ग्राहकांना कमळाचे फुल देऊन उपहासाने ‘एकही भूल कमल का फुल’ अशी घोषणाबाजी करीत पुन्हा भाजपाला निवडून देऊ नका अशी विनंती वजा पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधी अनोखे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे महेश तपासे, कल्याण डोंबिवली जिल्हा सरचिटणीस जव्हार मेहता, राष्ट्रवादी महिला काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षा सारिकाताई गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्षा विनयाताई पाटील, डोंबिवली शहर कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर, उपाध्यक्ष प्रसन्न अचलकर, सरचिटणीस जगदीश ठाकूर, कल्याण डोंबिवली ग्रामीणचे अध्यक्ष दत्ता वझे, सरचिटणीस गजानन मंगळूरकर, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे डोंबिवली अध्यक्ष निखिल पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेस डोंबिवली शहर कार्याध्यक्षा पूजा पाटील, राष्ट्रवादी सायबर सेल जिल्हा समन्वयक निरंजन भोसले, माजी नगरसेवक नंदू धुळे, शोभा कोटियान, स्मिता माने, वंदनाताई सोनवणे, भाऊ पाटील, शैलेंद्र भोजने, शैलेश गवळी, भालेराव सर, श्रीरंग भोसले, समीर गुधाटे, सुरज ठाकरे, मधुकर शेळके, नवीन राजगौर, सुमित सोनके, सिप्रित डिसोझा इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महेश तपासे म्हणाले, पेट्रोल आणि डिझेल दराने उच्चांग गाठला आहे. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर पूर्वीपेक्षा घसरले आहेत. तरीदेखील या सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेले नाहीत. आज कोणत्याही पेट्रोल-डिझेल इंधन धारकाला विचारलं तर तेही सांगतील कि, पेट्रोल-डीझेलची खरेदी दर कमी आहे. पण त्यावर असणारा केद्रीय एक्साईज, राज्यसरकारचा वॅट आणि पुन्हा सेस रूपाने पैसे उकळले जातात. असं करून कराच्या रूपाने साधारण 55 रुपये लुबाडले जात आहेत. नोटबंदीनंतर कारखानदारी बंद झाली नागरिकांकडे पैसे उरले नाहीत. यामुळे पेट्रोलचे दर कमी करण्याची मागणी आम्ही करीत आहोत. सरासरी एक लिटर पेट्रोल मागे 10 रुपये कमी करावे अशी आमची मागणी आहे. अर्धा भार महाराष्ट्र शासन आणि अर्धा भार केंद्र सरकारने उचलावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हे आंदोलन केले आहे.