कच्छ युवक संघात रक्तदानाचा संकल्प घेऊन काम करणारे कार्यकते

डोंबिवली : कच्छ युवक संघ डोंबिवली शाखा माध्यमातून श्री डोंबिवली मित्र मंडळ शिक्षा संस्थान यांच्या सहयोगातून तसेच एंकरवाला रक्तदान अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर म्हणजे एक संकल्प घेऊन केलेले सकारात्मक कार्य. कोरोनमुळे रक्ताची गरज वाढली त्यामुळे सर्वच स्तरावर रक्तदान शिबिरे होत आहेत. परंतु कच्छ युवक संघाचे रक्तदान शिबीरात वेगळेपण असते. शिबिरात मोठ्या संख्येने समाजातील तरुणवर्ग स्वेच्छेने सहभागी होत असतो. कोणत्याही गरजुला रक्त ताबडतोब मिळू शकते हीच वेगळी ओळख डोंबिवलीत संघाने निर्माण केली आहे असे गौरवउद्गार भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी रक्तदान शिबीर भेटी दरम्यान केले.

पूर्वेकडील के.बी. वीरा हायस्कूल येथे संयोजक राजेश लालजी मारू, सह-संयोजिका चारूल जतीन मारू, सहयोगी दाता मातुश्री जवेरबेन खुशालचंद गंगर (दुर्गापूर-नववास, कच्छ), प्रमुख पाहुणे अखिल कच्छी राजगोर महासभा प्रमुख प्रकाश वीरजी गोर उपस्थित रक्तदान शिबीर संपन्न झाले त्यावेळी आमदार रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी नगरसेवक विश्वजीत पवार, नंदकुमार जोशी, नंदकुमार परब, सायली विचारे, मिहीर देसाई, मितेश पेंडकर, संजय विचारे, अनिल ठाकर, समीर कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी कच्छ युवक संघ संस्थापक सदस्य प्रकाश वीरजी गोर म्हणाले, जेव्हा रक्ताची मागणी होते तेव्हा मंडळ रक्तदान शिबीर आयोजित करते आणि ते पूर्णपणे यशस्वी होते ही सेन्ट्रलबॉडीच्या दुर्ष्टीने कौतुकास्पद बाब आहे. संघर्ष करण्यासाठी आम्ही कच्छवासी नेहमीच तयार असतो. वीर सैनिकाप्रमाणे काम करण्याची परंपरा कच्छ युवक संघामध्ये आहे. कच्छ आणि कच्छवासियांमध्ये कोणताच बेदभाव नाही. संपूर्ण कच्छला एकत्र घेऊन जाणारी आमची संस्था आहे असेही त्यांनी पुढे सांगितले.

यावेळी शिबिरात सुमारे 215 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर प्रिन्स अन्नदान जागृती अभियानसाठी सुमारे 40 दात्यांनी घोषणा केली. रक्तदान शिबिरासाठी चिदानंद ब्लड बँक आणि प्लाझ्मा ब्लड बँकचे सहकार्य मिळाले. राजेश लालजी मारू, चारूल जतीन मारू, पंकच चापसी, सचिन माणिकलाल, सालवा आमिष नानजी केनिया, चीमनाभाई गोसार तसेच कच्छ युवक संघ डोंबिवली टीम यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कच्छ युवक संघ डोंबिवली तर्फे 20 आणि 27 डिसेंबर रोजी दोन रक्तदान शिबिरे होणार असल्याचे जाहीर केले.