
शिवप्रेमी, अभ्यासक, संशोधक,अग्रणी शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी विशेष जिव्हाळा असल्याने जसा २००५ सालच्या दीपावलीत डोंबिवलीत जशी ‘शिवराज्याभिषेकाची महारांगोळी’ रेखून शिवबाला कुर्निसातच केला गेला होता तसाच मुजरा सोळा वर्षांनी याच शिवभक्ताची स्मृति ग्रामदैवताच्या चरणी सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार तथा चित्रकार उमेश पांचाळ यांच्या कलारेखाटनाद्वारे रांगोळी प्रत्यक्षात साकार करण्यात आली. गणेश मंदिराच्या शेकडो प्रज्वलित दीपांनी उजळलेल्या या गाभाऱ्याचे शेकडो नागरिकांनी दर्शन घेतले. गणेश मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा अध्यक्ष राहुल दामले, रोटरीचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, इनरव्हील अध्यक्षा राजसी मोहिते, प्रकल्प प्रमुख मनीषा शिंदे, गंधाली निगुडकर, सचिव शैलेश गुप्ते, ज्योती दाते इत्यादींच्या सहकार्य आणि प्रयत्नांनी हा सोहळा यशस्वीपणे पार पडला. रोटरीच्या ३१४२ विभागाचे प्रांतपालांच्या पत्नी अंजली वारके या मंगलप्रसंगी आवर्जून उपस्थित होत्या.