डोंबिवलीत शिंदे समर्थकांकडून जल्लोष

डोंबिवली : डोंबिवलीत शिंदे समर्थक माजी नगरसेवक रणजित जोशी व माजी नगरसेविका वृषाली जोशी यांसह अनेकांनी फटाके फोडत जल्लोष केला.

माजी नगरसेवक जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर शिंदे समर्थकांनी फटाके वाजवले. नागरिकांना पेढे भरवत ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्रिपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्यभर शिंदे समर्थकांनी एकच जल्लोष केला. डोंबिवलीतही शिंदे समर्थकांकडून जल्लोष करून आम्ही आनंद व्यक्त केल्याचे माजी नगरसेवक रणजित जोशी यांनी सांगितले.