( ४ लाख २५ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त )
डोंबिवली : सोनसाखळी, मोबाईल, मोटार सायकल अशा जबरी चोऱ्या करणाऱ्या मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैयद उर्फ इराणी ( वय २४, रा. अनिल भगत चाळ, रूम नंबर ४, मंगल नगर अंबिवली पश्चिम ता. कल्याण) चोरट्याला पोलिसांनी सापळा लावून अटक केली. आरोपीकडून ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८ मोटार सायकली, ५ मोबाईल फोन असा एकुण ४ लाख, २५ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यांचे हददीत भोपर रोड नांदीवली पुर्व येथे राहणारे शरद पुंडलीक कडुकर हे शनिवार दिनांक 3 रोजी सकाळी ७.०० वा सुमारास भोपर कमानीजवळून पायी चालत जात असताना चोरट्याने पाठीमागे येवून त्यांच्या हातातील ११,५०० रूपये किमंतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरीने खेचून पोबार केला. या घटनेची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास करतांना गुप्त माहितीदार तसेच आरोपीच्या वर्णनानुसार आरोपीताचा शोध घेण्यांत येत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी शहाड कल्याण भागात सापळा रचला. एक इसम मोटार सायकल घेण्यासाठी शहाड रेल्वे स्टेशन परिसरात आला असता त्यांचा संशय आल्यांने त्यांस जागीच पकडुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांने गुन्हयांची कबुली दिली. यामध्ये मानपाडा, कळवा पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, मध्यवर्ती पोलीस स्टेशन, नारपोली पोलीस स्टेशन, कोळसेवाडी पोलीस ठाण्यांचे हददीत अटक आरोपीने साथीदाराचे मदतीने चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिग, मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

अटक आरोपी मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैयद उर्फ इराणी याचेकडुन ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८ मोटार सायकली, ५ मोबाईल फोन असा एकुण ४,२५,००० /- रू किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यांत आलेला आहे. आरोपीच्या विरोधात महात्मा फुले पोलीस स्टेशन, कोळसेवाडी पोलीस ठाणे, खडकपाडा पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस स्टेशन, डोबिवली पोलीस स्टेशन येथे यापुर्वी २१ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोलीस हवालदार राजकुमार खिलारे, शिरीष पाटील, सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, पोलीस नाईक यल्लापा पाटील, देवा पवार, पोलीस शिपाई अशोक आहेर, विजय आव्हाड, महेद्र मंझा यांच्या पथकाने केली.