कल्याणात प्रॉपर्टी प्रदर्शन, दीडशे पेक्षा जास्त प्रोजेक्ट

डोंबिवली : मुंबईत सर्वसाधारण लोकांना परवडणारी घरे मिळत नसल्याने आता घरे खरेदीदार कल्याण–डोंबिवली शहराकडे लक्ष ठेवून असतात. अशा लोकांसाठी रेरा रजिस्टरम असणारी परवडऱ्या घरांचे बांधकाम एस.सी.एच.आयने करण्याचे निश्चित केले असून त्याच बरोबर मुंबईप्रमाणे प्रशस्त आणि प्रगत घरांची निर्मिती केली आहे. या सर्व प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी दरवर्षी एस.सी.एच.आय. कल्याण डोंबिवली युनिटच्या तर्फे कल्याणामध्ये प्रॉपर्टी प्रदर्शन भरविते. असे दर्जेदार १३ वे प्रदर्शन ८ ते ११ फेब्रेवारी आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष भरत छेडा यांनी कल्याणा येथील पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, एक्झीबिशन कमिटी सचिव सुनिल चव्हाण, प्रमुख सल्लागार तथा माजी अध्यक्ष रवि पाटील, संजय पाटील, साकेत तिवारी, जयेश तिवारी, दिनेश मेहता,राहुल कदम, विकास वीरकर, रोहित दीक्षित, राजेश गुप्ता आदि उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष छेडा म्हणाले, या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर ते ठाणे, शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बघण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे.१६ लाखापासून सुरू होणारी आणि १ करोड पर्यंत घरे प्रदर्शनात उपलब्ध असणार आहे. तर माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना परवडतील अशी मनपसंत घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एस.सी.एच.आय. कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. या प्रदर्शनात ४० हुन अधिक विकासकांचे १५० हुन अधिक प्रोजेक्ट सादर करणार आहेत. दरवर्षी या प्रदर्शनाला २५ हजारहून अधिक नागरीक भेट देतात. या प्रदर्शनात सुप्रसिध्द अभिनेत्री शमिता शेट्टी भेट देणार आहे. या प्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर आणि पालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड व सुप्रसिध्द अभिनेत्री शमिता शेट्टी उपस्थित राहणार आहेत.