तेजज्ञान फाउंडेशनच्या ध्यान महोत्सवाची सांगता

डोंबिवली : पुणे येथील तेजज्ञान फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सुरु असलेल्या ध्यान महोत्सवाची सांगता 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्ताने देशभरातील तेजज्ञान फाउंडेशनच्या विविध केंद्रांवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पदाधिकारी नयना पिंपळे, प्रमोद गावडे व वैभव देशमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डोंबिवली पूर्वेत हॉटेल मॉडर्न प्राईड येथे तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने 25 तास अखंड ध्यान तसेच ध्यान मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे त्याबाबची माहिती देण्यात आली. यावेळी देशमाने म्हणाले, देशातील विविध केंद्रांवर, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते, अखंड ध्यान आणि मॅरेथॉनचे उद्घाटन होणार आहे.

तेजज्ञान फाउंडेशन पदाधिकारी नयना पिंपळे

मुंबईतील मुलुंड (पश्चिम) केंद्राच्या माध्यमातून १९ ऑक्टोबर २०२४ रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघ येथे आयोजीत करण्यात आलेल्या या उद्घाटन कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर, विजय पाटकर तसेच सुप्रसिद्ध गुजराथी अभिनेत्री नेहा मेहता उपस्थित रहाणार आहेत. हा सोहोळा सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत होणार असून अखंड ध्यान आणि ध्यान मॅरेथॉन हे उपक्रम सर्वांसाठी खुले आहेत.

तेजज्ञान फाउंडेशन सदस्य विनायक कुलकर्णी
तेजज्ञान फाउंडेशन सदस्या डॉ. पल्लवी भिरूड

गेल्या पंचवीस वर्षापासून सरश्री यांनी समाजाला ध्यानाचे महत्त्व कळण्यासाठी असंख्य प्रवचने दिली आहेत. जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत तेजज्ञान फाउंडेशनचे हजारो साधक संघध्यान, करून जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हातभार लावत आहेत.