ठेकेदाराचा ठेका रद्द करा, आमदार राजेश मोरे यांची मागणी
डोंबिवली : पूर्वेकडील एका स्मशानभूमीत बाल कामगार काम करत असल्याचा व्हिडिओ सामाज माध्यमात व्हायरल होते आहे. याविषयी कल्याण ग्रामीण विधानसभा आमदार राजेश मोरे यांनी तेथील ठेकेदारावर करावाई करावी व ठेका रद्द करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

बाल कामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा कायदा, 2016 हा कायदा 1 जानेवारी 2016 रोजी लागू झाला. या कायद्यानुसार 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कामावर ठेवणे पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले जाते. या कायद्याने 14 ते 18 वयोगटातील मुलांनाही धोकादायक कामांवर काम करण्यास बंदी घातली आहे. 14 वर्षाखालील मुलांवर कामावर बंदी असून या कायद्यानुसार, 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या कामावर ठेवता येत नाही. या कायद्याअंतर्गत, बालकामगार (किंवा बाल कामगारांची कामे) शोधल्यास, त्यांची सुटका केली जाते आणि त्यांना पुनर्वसन करण्यासाठी मदत केली जाते.
या कायद्याचे उल्लंघन झाल्यास, संबंधित व्यक्तीला दंडात्मक कारवाईला (जुर्माना किंवा कारावास) सामोरे जावे लागते. या कायद्याचा उद्देश मुलांचे संरक्षण करणे, त्यांना शिक्षणाची संधी देणे आणि बालमजुरीला पूर्णपणे प्रतिबंध करणे आहे.

डोंबिवलीतील स्मशानभूमीत एक लहान मुलगा खादयावर लाकडे उचलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत कल्याण ग्रामीण विधानसभा आमदार राजेश मोरे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, त्या स्मशानभुमीत बाल कामगार असतील तर तशी माहिती घेतो. जर तिथे बालकामगार असतील तर जो कोणी ठेकेदार असेल त्याचा ठेका रद्द झाला पाहिजे.