डोंबिवलीत भाजपा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदार संघ परिक्षेत्रात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही भाजपा आमदार तथा भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या उवक्रमाचे नियोजन भाजपा पूर्व मंडल, पश्चिम मंडल आणि ग्रामीण मंडल कार्यालय मार्फत करण्यात आले. यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी पूर्व नियोजन करून हा उपक्रम यशस्वी केला.त्याचाच भाग म्हणून पश्चिम विभागात जुनी डोंबिवली येथील भारतीय जनसंपर्क कार्यालयात भाजपा पदाधिकारी कृष्णा पाटील व पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात जुनी डोंबिवली, ठाकूरवाडी, यशवंत नगर, विजयनगर, तेलकोसवाडी परिसरातील सुमारे 2500 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

तर भाजपा प्रभाग क्रमांक ६२ सखारामनगर येथे
भारतीय जनता पार्टी माध्यमातून भाजपा आमदार, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष भाजपा, महाराष्ट्र श्री.रविंद्र (दादा) चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ.सर्वेश शाहू सावंत (एम.एस.आर्थो) यांच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात करण्यात आल्या. या उपक्रमाचा सुमारे ७०० पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.तसेच पश्चिमेकडील जाधववाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. दरम्यान भाजपा पदाधिकारी तथा साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी सांगितले कि, गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये म्हणून भारतीय जनता पार्टी नेहमी मदत करत असते. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजकार्यात खारीचा वाटा म्हणुन असे सामाजिक कार्य केले जाते.