भाजपा पदाधिकारी गोपीचंद पाटील यांच्या पुढाकाराने डोंबिवली पूर्वेत नागरिक सेवा सुविधा शिबिर !

( अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि आयुष्मान कार्डसाठी मिळणार मार्गदर्शन )

डोंबिवली : नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा तसेच आवश्यक शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टी तर्फे डोंबिवली पूर्वेत नागरिक सेवा सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप कल्याण ग्रामीण मंडळ-३ अंतर्गत प्रभाग क्रमांक ३० चे प्रमुख गोपीचंद दत्तात्रय पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर ९, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नांदिवली पाडा, सागाव, डोंबिवली पूर्व येथील देविदास केबल नेटवर्क परिसरात होत आहे. या शिबिरात नागरिकांना अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि आयुष्मान कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे.

शासकीय सेवांचा लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात येताना अधिवास प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक कार्डासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणावे. तर आयुष्मान कार्डासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच आधार कार्डशी जोडलेला मोबाइल क्रमांक आवश्यक आहे अशी माहिती गोपीचंद पाटील यांनी दिली. शुक्रवारी पहिल्याच दिवशी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

आयोजित या शिबिर कार्यक्रमाला कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, कर्ण जाधव (अध्यक्ष ग्रामीण मंडळ 3), चेतन काळण (कल्याण ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष), मनिषा राणे, दर्शन मढवी, (अध्यक्ष ओबीसी मोर्चा ) यांची मुख्य उपस्थिती जेओटी. तर शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रथमेश वझे, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी, रतन पुजारी, श्रीधर बत्तीनी, नितीन पाटील,गोविंद शेखावत,
राजन पांडे, अनिकेत अंकुशे, आकाश पाटील, प्रशांत पठाडे, मोहित पाटील, अक्षय अंकुशे यांनी मेहनत घेतली.