डोंबिवलीत कोसळली चाळीस वर्षांची जुनी इमारत
डोंबिवली, दि. ४ (प्रतिनिधी) : पूर्वेकडील जुना आयरे रोडवरील “गंगाराम सदन” नावाची जुनी लोड बेरिंग ४० वर्षांपूर्वीची इमारत अचानक दुपारी कोसळली. परंतु या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी सव्वाएक दरम्यान मोठा आवाज होऊन इमारत कोसळली. इमारत कोसळण्यापूर्वी इमारतीमधून माती पडत असल्याचे लक्ष्यात येताच इमारतीतील रहिवासी घाबरून बाहेर आले त्यामुळे कोणीही अडकून पडले नाही. परंतु तळमजल्यातील स्वस्तिक लाँड्रीचा मालक बाहेर गेल्यामुळे तसेच एक कुटुंब वास्तव्य करीत होते पण सर्व बाहेर पडल्याने कोणतीही अप्रिय घटना झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच पालिका सभागृहनेते राजेश मोरे, प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, रामनगर पोलीस बळ, फायर ब्रिगेड जवान आदींनी घटनास्थळी पोहचून बचावकार्य पार पाडले. यावेळी राजेश मोरे म्हणाले, पंडित केणे यांच्या मालकीची इमारत असून या इमारतीत कोणीही रहात नव्हते. मात्र पालिकेच्या नोंदीमध्ये तळमजला अधिक एक असा इमारतीबाबत उल्लेख असल्याने पालिकेच्या करभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते