महानगरपालिका रस्‍त्‍यांची साफसफाई होणार मशीनव्‍दारे

डोंबिवली, दि. ७ (प्रतिनिधी) : कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्ष्‍ोञात महाराष्‍ट सुवर्ण जयंती नगरोत्‍थान महाअभियानांतर्गत सुमारे 32.58 किमी. सिमेंट कॉक्रीट रोडची कामे अंतीम टप्‍प्‍यात आहेत. सुमारे 90 टक्‍के रस्‍ते पूर्ण झालेले आहेत. तयार झालेले रस्‍ते साफ सफाई करीता महापालिकेकडे मनुष्‍यबळ अपूरे आहे. त्‍याकरीता महापालिके अंतर्गत असलेल्‍या महत्‍वाच्‍या रस्‍त्‍यांची सफाई पॉवर स्विपींग मशीन व्‍दारे होणार आहे.यायांञीक मशीनचे लोकार्पण महापौर राजेंद्र देवळेकर यांचे हस्‍ते करण्‍यांत आले. याप्रसंगी उपमहापौर, मोरेश्‍वर भोईर, मबाकवि सभापती वैशाली पाटील, गटनेते रमेश जाधव, वरूण पाटील, नगरसेवक जयवंत भोईर, सुधीर बासरे , उपायुक्‍त धनाजी तोरस्‍कर, हे उपस्थित होते.
रस्‍ते साफसफाई करणेकरीता पॉवर स्विपींग मशीनद्वारे मनुष्‍यबळासह 7 वर्ष करणे करीता जाहिर निविदा दि.25.10.16 रोजी प्रसिध्‍द करणेत आली होती. त्‍यास अनुसरुन प्राप्‍त निविदांपैकी न्‍युनतम निविदाधारक मे.क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा.ली. मुंबई यांचेशी वाटाघाटी करून 28,000/-प्रति शिफट, 5 टक्‍के प्रति वर्ष वाढीसह हे दर अंतिम करण्‍यात आले. यात महापालिकेने कोणतीही भांडवली गुंतवणूक केलेली नाही.
विहित प्रचलित कार्यपध्‍दती पूर्ण करून सदर ठेकेदारास एप्रिल 2017 ला कार्यादेश देण्‍यात आला. दोन पॉवर स्विपर मशीन पैकी एक मशिन प्राप्‍त झाली असुन, दुसरी मशीन येत्‍या दहा दिवसात महापालिकेच्‍या ताफयात उपलब्‍ध होणार आहे. शहर स्‍वच्‍छते करीता महापालिका विविध प्रकारच्‍या उपाय योजना करीत असुन, पॉवर स्विपर हा त्‍याचाच एक भाग असल्‍याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगीतले.
पॉवर स्विपर मशीनद्वारे सिंमेंट कॉक्रिट रोडची साफसफाई सुधारीत तांञिक पध्‍दतीने होणार आहे.रस्‍त्‍यांच्‍या साफसफाईचे काम जलदगतीने होणार असुन,वेळेची देखिल बचत होणार आहे. अत्‍याधुनिक पध्‍दतीने साफसफाई होणार असल्‍याने धुळीमुळे नागरीकांना होणारे श्‍वसनाचे, फुफुसांचे व या संबंधित उध्‍दवणारे आजाराचें प्रमाण दखिल कमी होणार आहे.