भटक्या कुत्र्यांची दहशद : भटक्या कुत्र्यांनी लहानगीचे घेतले लचके

डोंबिवली : ग्रामीण विभागातील कल्याण-शिळ रोडवरील लोढा हेवन परिसरात भटक्या कुत्र्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन फेल झाले आहे. दिवसरात्र भटकणाऱ्या कुत्र्यांच्या टोळीने  या परिसरातील लहानगीवर हल्ला चढविला. ठिकठिकाणी या भटक्या कुत्र्यांनी चावे घेऊन मुलगी जखमी झाल्याने  येथे भितीचे वातावरण झाले आहे.

शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या माही सिंग या 8 वर्षीय मुलीवर नकळत 5 ते  6 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्या मुलीच्या अंगावर धावून त्यांनी तिचे लचके तोडले. हा प्रकार पाहताच तेथील लोकांनी तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली आणि ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. सध्या प्राथमिक प्राथमिक उपचारानंतर दिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे स्थानिक लोक संतापले आहेत. अशा भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास मोठे आंदोलन करु असा इशारा स्थानिक लोकांनी दिला आहे.

शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून अशा रोज घटना घडत असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास पालिका प्रशासन कुचकामी ठरत आहे का अशी विचारणा होत आहे. याचे कारण म्हणजे याच परीसरात गुरुवारी श्वेता मेहरा महिलेवर 7 ते 8 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. परतून महिलेने प्रसंगावधान दाखवून तिने स्वत:ची सुटका करून जीव वाचवला. परंतु या झटापटीत महिलेचा महागडा मोबाईल फुटला. दुसऱ्या आणखी घटनेत चंद्रेश शर्मा यांनी गेल्या महिन्यातील 27 तारखेला या विषयाचे एक पत्र प्रशासनास पाठवून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. शहर तसेच ग्रामीण विभागात अशा भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या दिवसागणिक वाढत असून येथील लोकांना भीतीयुक्त जीवन जगावे लागत आहे. विशेष म्हणजे रात्रपाळी करून येणाऱ्या चाकरमान्याना रात्री घर गाठणे कठीण होत आहे. मुख्य रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडी फिरत असतात. दुचाक्यांच्या मागे ही कुत्री झुंडींनी धावत असतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने कुत्र्यांच्या विषयी लक्ष घालावे आणि त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.