डोंबिवली : डोंबिवली मतदार संघात नवीन मतदार नोंदणी तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांची माहिती सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी बुधवार 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता 143 डोंबिवली विधानसभा मतदार संघाच्या पु, भा. भावे सभागृह, डोंबिवली पश्चिम येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व राजकीय पक्षांच्या प्रितनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदार यादीत सुधारणा करुन 1 जानेवारी 2019 या तारखेपर्यत आधारित याद्या तयार करण्यात येणार आहेत. या माहितीचे संगणकीकरण करण्यात येणार असून परिपूर्ण मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. ज्यांचे कृष्ण धवल छायाचित्र व जुने 16 अंकी मतदार ओळखपत्र अशा मतदारांचे वास्तव्यांची खात्री करुन नवीन रंगीत फोटेा गोळा करुन ते अपलोड करण्यात येणार आहे. ही सर्व माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रितनिधींना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.