गोकुळ महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर

डोंबिवली : सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त करून वेगळा ठसा उमटविणार्‍या गोकुळ मित्र मंडळाच्या महिला मंडळाची लोकशाही पध्दतीने निवडलेली कार्यकारिणी गुरूवारी जाहीर करण्यात आली. प्रत्येक महिलेला नेतृव करण्यासाठी संधी मिळावी व नेतृत्वगुण विकसित व्हावा या हेतूने दरवर्षी गोकुळ महिला मंडळाच्या कार्यकारिणीत लोकशाही पध्दतीने बदल करण्यात येत असतो. गेली २८ वर्षे ही परंपरा मंडळाने कायम राखली आहे.

गोकुळ महिला मंडळाच्या मावळत्या अध्यक्षा सुलभा भाटे व कार्याध्यक्षा सुनिता देशपांडे यांनी मंडळाच्या विषेश सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीचा प्रस्ताव मांडला. सदर प्रस्ताव सर्व महिला सदस्यांनी एकमुखाने मंजूर करून अंतिम मंजूरीसाठी गोकुळ मित्र मंडळाचे अध्यक्ष अजित रमण जोशी, प्रमुख सल्लागार श्रीपाद पाटील व सरचिटणीस अशोक शिंदे यांच्याकडे पाठविला. सदरचा प्रस्ताव मंडळाच्या या उच्चस्तरीय त्रिसदसीय पॅनलने विचारविनिमय करून मंजूर करून गोकुळ महिला मंडळाची नवीन कार्यकारिणी खालील प्रमाणे जाहीर केली.

अध्यक्षा : मीना जावकर, कार्याध्यक्षा : सुनिता देशपांडे, उप कार्याध्यक्षा : रोहिणी पाटील, उपाध्यक्षा : मनिषा बर्‍हाटे, सचिव : किर्ती पत्की, उपसचिव : सरला पवार, खजिनदार : सुलभा भाटे, उप खजिनदार : वंदना किरंगे, विशेष सल्लागार, वनिता रसमभैरै, कमल घारपुरे, सल्लागार : प्रफुल्ला शेट्टी, चतुरा नलावडे, मंगला कोळी, विजया परब