महा ई सेवा केंद्र व सेतू केंद्रातर्फे दाखले शिबिर

महा ई सेवा केंद्र व सेतू केंद्रातर्फे दाखले शिबिर

( कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनोखा उपक्रम)

डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले विद्यार्थ्यांना  तसेच जेष्ठ नागरिकांना सहज उपलब्ध व्हावेत या उद्देशाने तहसील कार्यालय महाईसेवा केंद्र व सेतू केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका “ह” प्रभाग सभापती वृषाली रणजित जोशी यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात दाखले शिबिराचे आयोजन केले आहे.

पश्चिमकडे देवी चौक येथील जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात चार दिवस दाखले शिबीर घेण्यात आले आहे. इच्छुकांनी आवश्यक दाखल्यांसाठी योग्य माहिती भरून अर्ज सादर करायचा असून सोबत अधिकृत कागदपत्रे सोबत द्यायची आहेत. अर्ज भरल्यानंतर त्याची खातरजमा होऊन इच्छुकांना आवश्यक दाखला मिळणार आहे. यामध्ये स्थानिक वास्तव्याचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, उत्पन्नाचा दाखला, जेष्ठ नागरीक दाखला मिळण्याची व्यवस्थ करण्यात आली आहे. विशेषम्हणजे या शिबिरात केंद्रीय तसेच राज्य शासनाच्या योजनांची माहिती देऊन आत्मनिर्भर होण्यासाठी अनुभवी मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन दिले जात असल्याची माहिती माजी नगरसेवक रणजित जोशी दिली आहे.
डोंबिबलीत दाखले मिळण्याची सोया झाल्यामुळे  कल्याणला जाण्याचा त्रास कमी झाला आणि वेळेची व प्रवासाच्या खर्चाची बचत झाली असल्याने जनसंपर्क कार्यालयात दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. परंतु कोरोना संक्रमणबाबत काळजी घेऊन मास्क आणि सोशल अंतराचे भान ठेवून क्रमाक्रमाने बोलाविले जात आहे. दाखले शिबिरासाठी सभापती वृषाली जोशी आणि कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.

दाखल्यांसाठी अर्ज दाखल करतांना विद्यार्थी व जेष्ठ नागरिक