आमच्या गावचा रस्ता चकाचक होणार याचा आनंद खूप मोठा आहे

( माजी नगरसेविका वृषाली जोशी याचे उदगार )

डोंबिवली : ज्या गावात लहानाची मोठी झाले आता त्याच गावातील रस्ता काँक्रीटीकरण माध्यमातून चकाचक होत आहे याचा आनंद मोठा आहे. माझे पती माजी नगरसेवक आणि मी स्वतः नगरसेविका कालखंडांत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण माध्यमातून व्हावा यासाठी भरपूर प्रयत्न केले पण एव्हढ्या मोठ्या निधीची व्यवस्था महापालिका करू शकली नाही. त्यामुळेच फक्त डांबरीकरण करून रस्ता चांगला ठेवण्यासाठी कटिबद्ध राहिलो. मात्र आता आम्ही तो पाठपुरावा सोडा नाही आणि आता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हा रस्ता होत आहे. त्यामुळे आता डोंबिवलीकरांनी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले पाहिजेत असे वक्तव्य माजी नगरसेविका वृषाली जोशी यांनी केले.

पश्चिमेकडील पांडूशेठ बाळा जोशी चौक ( स. है.जोंधळे शाळा ) ते जुनी डोंबिवली रेल्वे फाटकपर्यतचा रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १३.५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या विकास कामाचा शुभारंभ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका वृषाली जोशी, माजी नगरसेवक रणजीत जोशी, बाळासाहेबांची शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, दिपेश म्हात्रे,गजानन व्यापारी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी व्यस्त कामकाज असूनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आमच्या कार्यालयाला भेटही दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

यावेळी माजी नगरसेविका जोशी म्हणाले, खासदार डॉ. शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नाने आज माझ्या गावातील रस्ता कॉंक्रीटीकरण पद्धतीने होत आहे. मी याच गावत लहानाची मोठी झाली असल्याने या गावाबद्दल खूप आपुलकी आहे. माझ्या गावकीचा रस्त्याची अनेक वर्ष फक्त डांबरीकरण आणि डागडुजी होत होती. आता साडे १३ कोटीचा निधी माझ्या प्रभागासाठी मंजूर झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानते. या विकास कामाला माजी महापौर विनिता राणे यांचेही फार मोठे सहकार्य लाभले आहे. दरवर्षी खड्ड्यांचा प्रश्न, वाहनांचा अपघात आणि वाहतूक कोंडी यातून आता सुटका होणार आहे. आता नक्कीच संपुर्ण डोंबिवलीत विकासाची कामे होतील असा विश्वास आहे.