तुमच्या आवडीचा विषय निवडा आणि त्यात प्रावीण्य मिळवा !

— डॉ.राजकुमार कोल्हे

डोंबिवली : विद्यार्थ्यांनी सध्या कोणत्या क्षेत्रात संधी आहेत, याचा अभ्यास करून त्या शाखेची निवड केली पाहिजे. पालक किंवा मित्र मैत्रिणी सांगतात म्हणून तुम्ही त्या विषयाची निवड करू नका. तुमच्या आवडीचा विषय निवडा आणि त्यात प्रावीण्य मिळवा असे प्रतिपादन जन गण मन आणि वंदे मातरम कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य  डॉ. राजकुमार कोल्हे यांनी डोंबिवलीत केले.

शिवसेना शाखा क्रमांक 64/54 यांच्या माध्यमातून आणि माजी जेष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, माजी महापौर विनिता राणे यांच्या पुढाकाराने पश्चिम विभागात तेलकोसवाडी येथे जनगणमन शाळेच्या सभागृहात 10वी /12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते तेव्हा डॉ. कोल्हे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी महापौर विनिता राणे,
प्राचार्य  डॉ. राजकुमार कोल्हे, प्राचार्य डॉ. प्रेरणा कोल्हे, ज्येष्ठ पत्रकार आत्माराम नाटेकर, गोविंद राणे, युवा सेना समन्वयक प्रतीक राणे, उपशहर प्रमुख दिनेश शिवलकर, विभागप्रमुख अजय पांचाळ, जितेंद्र नाचरे, शाखाप्रमुख धनाजी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मौलिक सूचना केल्या.जेव्हढे तुम्ही स्वाभिमानी व्हाल, तेव्हा तुमची वाटचाल चांगली आणि यशस्वी  होईल, शांत मन चांगले निर्णय घेत असते. विद्यार्थ्यांनी एमपीएससीची परीक्षा देऊन आयएएस /आयपीएस व्हा असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी सुमारे 200 विद्यार्थ्यांना भेटवस्तु, पुष्पगुछ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. माजी महापौर विनिता राणे यांनीही यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम नाटेकर यांनी केले.