भाजपा डोंबिवली पूर्व शहर उपाध्यक्ष पदी राजू शेख यांची नियुक्ती

डोंबिवली : भाजपा डोंबिवली पूर्व शहर उपाध्यक्ष पदी राजू शेख यांची नियुक्ती केली आहे. राजू शेख हे २०१५ पासून भाजपा मध्ये काम करत आहेत. त्यांचे काम पाहून पक्षाने त्यांच्यावर दुसऱ्यांदा शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

राजू शेख यांनी भाजपाच्या शहर सचिव पदाची धुरा देखील समर्थपणे सांभाळली आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडे शहर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाने दोन वेळेस विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. शिवशंकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पद सलग १८ वर्ष ते भूषवित आहेत. स्व शिवाजी दादा शेलार नवरात्र उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून ही ते काम पाहत आहेत. मंगल कलश गृहनिर्माण संस्थांचे मागील ११ वर्षांपासून सचिव म्हणून कारभार पाहत आहे. त्यांचे हे सर्व काम पाहून पक्षाने आता पुन्हा शहर‌ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते राजू शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण लोकसभा संयोजक शशिकांत कांबळे ,भाजपा जिल्हा सरचिटणीस नंदू परब, सरचिटणीस अमित धाकरस उपस्थित होते.