डोंबिवली : वीरांगना ट्रस्टच्या तर्फे नुकताच दुसरा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. ३० जुलै २०२३ रोजी वीरांगना ट्रस्टची स्थापना झाली असून संस्थेच उद्देश महिलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आहे. संस्थेच्या माध्यमातून महिलांना स्वसंरक्षणासाठी शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच योग शिक्षण देण्यात आले.गेल्या दोन वर्षांत ट्रस्टच्या वतीने वृक्षारोपण, रक्तदान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गंगा भागीरथी महिलांसाठी चंदन वंदन हा कार्यक्रम राबविण्यात आला. अनेक अनाथाश्रम, मतीमंद मुलांच्या शाळेसाठी मदत करण्यात आली. आगामी काळात वीरांगना ट्रस्टच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे वीरांगना ट्रस्टच्या अध्यक्षा उमा सिंग यांनी सांगीतले.