डोंबिवली : देशाच्या सीमेवरील भारतातील 12 रेंजिमेंटला व सियाचीन ग्लोशियाला डोंबिवलीतील 1005 विद्यार्थ्यांनी राख्या पाठवल्या. रिया रणजित राय या विद्यार्थिनीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीना राख्या बनविण्यास शिकवले. सैनिक हो तुमच्यासाठी असा उपक्रम असून याकरिता डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा येथील मॉडेल महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.
देशभक्तीवर आधारित या उपक्रमात सैनिकांकरता मॉडेल महाविद्यालयाच्या प्राचार्य रवींद्र बम्बार्डेकर, उपप्राचार्य शर्वरी कुलकर्णी आणि श्रीलता राजाराम यांनी जयहिंद फाऊंडेशनच्या मध्यमातून एक राखी एक संदेश राबविला. प्राध्यापक मेघना शिंदे, प्राध्यापक पियाली भट्टाचार्य व जयहिंद फाउंडेशनच्या सदस्य पुनम फडतरे (असिस्टंट टीचर ज्युनियर कॉलेज आयटी डिपार्टमेंट ) व केरलीय समाज यासह महाविद्यालयातील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.