डोंबिवलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आंदोलन

डोंबिवली : राज्यातील महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांनी महाराष्ट्र देशभरात बदनाम होत असल्याचा आरोप करत राज्यातील जनतेला या सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत जागृत करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे सोमवारी डोंबिवलीत आंदोलन करण्यात आले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, अभिजित सावंत, तात्या माने, वैशाली दरेकर, उपशहर प्रमुख शाम चौगले, विलास म्हात्रे, चेतन म्हात्रे, शहर सचिव सुरेश परदेशी, विभाग प्रमुख राजेंद्र सावंत, नितीन पवार, अनिल मुथा, शेखर चव्हाण, युवा विधानसभा आदित्य पाटील, कुणाल ढापरे,शिबू शेख, संदेश कदम, प्रिय दांडगे, नवले राकेश मोहिते, भारतीय नाचरे, साक्षी भांडे, अनिता जंगले, ममता सायगावकर, संदीप उबाळे आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवसैनिकांनी घरात बॅग पैशाची सत्ता पन्नास खोक्याची, महायुती सरकारमधील भष्ट्रचारी मंत्र्यांची हाकलपट्टी करा, काळे धंदे भष्ट्र कारभार, सत्ताधारी महाराष्ट्रावर भार असे बॅनर घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सत्तेतील आमदारांविरोधात घोषणाबाजी केली.

पूर्वेकडील इंदिरा चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी दिपेश म्हात्रे म्हणाले, राज्य सरकारमधील समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा ६० कोटींचा घोटाळा आणि १५०० कोटींचा गैरव्यवहार, कृषीमंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचे रमीचे डाव, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे असलेला डान्सबार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हनी ट्रॅप प्रकरण अशा अनेक त्यांनी सरकारवर टीका केली.
शिवसैनिकांनी जाहीर निषेध करतांना या सरकारचं करायचं काय अशा घोषाला करीत परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे सरकार दरबारी बॉक्सिंग फायटिंग आणि रमीचा डाव कशा पद्धतीने चालतात त्याचे व्यंगात्मक प्रात्यक्षिक दाखवून सरकारचे वाभाडे काढले.